दारूबंदीनंतर चंद्रपुरात तब्बल २५ कोेटींची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:01 PM2018-01-03T16:01:03+5:302018-01-03T16:03:27+5:30
जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ला दारूबंदी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत २५ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर, तब्बल ५६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ हजार आरोपींवर खटले दाखल करण्यात आले आहेत.
आॅनलाईन लोकमत
चंंद्रपूर : जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ला दारूबंदी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत २५ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर, तब्बल ५६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ हजार आरोपींवर खटले दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी विविध संघटना व महिलांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढल्याने राज्य शासनाला दखल घ्यावी लागली. परिणामी, तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने दारूबंदीचा निर्णय घेण्यासाठी देवतळे समिती गठित केली. या समितीनेही दारूबंदीची शिफरस केली होती. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी दारूबंदीसाठी विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. या बंदीनंतर आतापर्यंत ५६ कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. दारूविक्री आणि वाहतुक करणाऱ्या ९ हजार ५० आरोपींवर खटले दाखल केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.