दीर्घ उसंतीनंतर अखेर बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:18+5:302021-09-21T04:31:18+5:30

जिल्ह्यात गणेशचतुर्थीपासून पावसाने दडी मारली होती. काही तालुक्यांत कुठे रिपरिप, तर कुठे १०-१५ मिनिट पावसाने हजेरी दिली. जिल्ह्याच्या ...

After a long hiatus, it finally rained | दीर्घ उसंतीनंतर अखेर बरसला

दीर्घ उसंतीनंतर अखेर बरसला

Next

जिल्ह्यात गणेशचतुर्थीपासून पावसाने दडी मारली होती. काही तालुक्यांत कुठे रिपरिप, तर कुठे १०-१५ मिनिट पावसाने हजेरी दिली. जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, ढगाळ वातावरण तयार होऊनही पावसाने हुलकावणी दिली. ऐन विसर्जनाच्या कालावधीत पावसाने कम बॅक केले. सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनाची सायंकाळी तयारी सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने अनेकांची धावपळ झाली. मध्यरात्री काही काळ बरसल्यानंतर सोमवारी सकाळपासून पाऊस पुन्हा सुरू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला. पावसामुळे आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड धरणांमध्ये सोमवारपर्यंत १२३.३९४ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

बॉक्स

धरणनिहाय जलसाठा टक्के

आसोलामेंढा ६७.२७

घोडाझरी ७५.७७

नलेश्वर १००

चंदई १००

चारगाव १००

अमलनाला १००

लभानसराड १००

पकडीगुड्म १००

डोंगरगाव १००

इरई ७१.३३

Web Title: After a long hiatus, it finally rained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.