आयएसओ नामांकनानंतर घाटकुळ झाले नवा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:37 PM2019-07-03T22:37:01+5:302019-07-03T22:37:16+5:30
मुख्यमंत्र्यांच्या नाविन्यपूर्ण महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळची विकास कामातून आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. नुकतेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. थेट आयएसओ ग्रामपंचायतीचे लोकार्पण करण्यात आलेली घाटकुळ ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्र्यांच्या नाविन्यपूर्ण महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळची विकास कामातून आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. नुकतेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. थेट आयएसओ ग्रामपंचायतीचे लोकार्पण करण्यात आलेली घाटकुळ ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, ग्राम पंचायत घाटकुळ आयोजित नाविन्यपूर्ण 'ग्रामसंवाद' कार्यक्रम व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी प्रशासनाला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपसभापती विनोद देशमुख, जि.प.सदस्य राहुल संतोषवार, पं.स.सदस्य गंगाधर मडावी, ज्योती बुरांडे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल उपस्थित होते.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी आयएसओ नामांकित करण्यात येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी पुढाकार घेतला. शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीत अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीच्या बोलक्या भिंती, सौर ऊर्जा, अग्निशमन यंत्र, बायोमेट्रिक हजेरी, प्रथमोपचार पेटी, सुशोभित परिसर, सुचना व तक्रार पेटी, शिस्त, स्वच्छता, अद्ययावत रेकॉर्ड, गुणवत्ता धोरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पक्की रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जात आहे. हरित व स्वच्छ ग्राम तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत घाटकुळ अव्वल ठरले. आता आदर्श व स्मार्ट ग्रामकडे गावाची वाटचाल सुरू आहे. सरपंच प्रीती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, ग्रामसेवक ममता बक्षी, सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, सुनिता वाकुडकर रजनी हासे, प्रज्ञा देठे, वामन कुद्रपवार, अनिल हासे, उत्तम देशमुख, आकाश देठे, राम चौधरी, गणपती पाल, अशोक पाल, मुकुंदा हासे, स्वप्नील बुटले, विठ्ठल धंदरे, ज्ञानेश्वर चौधरी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.