पुनर्वसन केल्यानंतरच घरे खाली करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:45 PM2018-10-31T22:45:38+5:302018-10-31T22:46:22+5:30
परकोटा लगत ४० ते ५० वर्र्षांसून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पुरातन विभागाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील नागरिकांना पहिल्यांदा घरे द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवारांनी दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परकोटा लगत ४० ते ५० वर्र्षांसून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पुरातन विभागाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील नागरिकांना पहिल्यांदा घरे द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवारांनी दिला होता. याची दखल घेत परकोटा लगत असलेल्या घरांचे पुनर्वसन व स्थायी पट्टे दिल्यानंतरच घरे खाली करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी किशोर जोरगेवार यांना दिले.
परकोटा लगत मागील अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्या आहेत. या नागरिकांना प्रशासनाकडून घर खाली करण्यासंदर्भाती नोटीस दिले होते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून कुठे वास्तव्य करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. पुरातन विभाग परकोटा लगत असलेल्या नागरिकांचे घर तोडण्यासाठी निघाले आहे व त्यातच आता काही घर नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. त्यांचे घरे खाली करण्यात आले तर येथील नागरिक बेघर होतील अश्यातच चंद्रपूरमध्ये रोजगार नसल्याने त्यांना भाड्याने राहणे शक्य नाहीे.
त्यामुळे पहिले पुनर्वसन करून स्थायी स्वरुपी पट्टे द्यावे नंतरच त्यांचे घर खाली करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवार यांनी दिला. यावेळी इरफान शेख, विनोद अनंतवार, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अमोल शेंडे, नितीन नागरीकर, सतनाम सिंह, सलीम मामू, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे आदी उपस्थित होते.