वर्ष लोटून शासनाकडून मिळाली नाही बारदान्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:08+5:302021-06-02T04:22:08+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी सोसायटी सेवा सहकारी संस्थेत बारदान्याचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना बारदान्याचे पैसे शासनाकडून परत ...

After a year, I have not received any amount from the government | वर्ष लोटून शासनाकडून मिळाली नाही बारदान्याची रक्कम

वर्ष लोटून शासनाकडून मिळाली नाही बारदान्याची रक्कम

Next

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी सोसायटी सेवा सहकारी संस्थेत बारदान्याचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना बारदान्याचे पैसे शासनाकडून परत मिळतील, असे सांगण्यात आले होते. मागील वर्षी उन्हाळी हंगामाचे धान शेतकऱ्यांनी स्वतः बारदाना खरेदी करून विकले. मात्र, वर्ष लोटूनसुद्धा बारदान्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

सावरगाव येथे मागील अनेक वर्षांपासून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहे. २०२० मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आदिवासी सोसायटीत धान्य विक्रीसाठी आणले असता बारदाना नसल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने बारदाना खरेदी करून धान्य विक्री केल्यास बारदान्याचे पैसे शासनाकडून परत मिळतील, असे संस्थेकडून सांगण्यात आले. त्यानुसार सावरगाव, चिखलगाव, वलनी येथील एकूण २१० शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने बारदाना खरेदी करून धान्य विक्री केले. या शेतकऱ्यांच्या बारदान्याची एकूण रक्कम १९ हजार ५८७ रुपये एवढी आहे. मात्र, आजघडीला वर्ष लोटूनसुद्धा बारदान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने जमा केलेली नाही. सद्य:स्थितीत राज्यात कोरोनाचे सावट आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर व दुकानदारांची कोंडी झालेली आहे. अनेक नागरिकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.

कोट

शासनाने हमी दिल्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतः बारदाना खरेदी करून धान्य विक्री केली. मात्र, वर्षभर वाट पाहूनसुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत. आता दाद मागायची कोणाकडे? वरिष्ठांनी याबाबीची दखल घ्यावी.

-बाजीराव कोहरे, एक शेतकरी, सावरगाव, ता. नागभीड

कोट

शेतकरी बारदान्याच्या पैशाबाबत नेहमी विचारतात. याबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली, तर राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही, असे सांगितले. शेतकऱ्यांची नावे व रकमेची यादी वरिष्ठांकडे पाठविली आहे.

-प्रेमदास सडमाके, सचिव, आदिवासी सोसायटी सेवा सहकारी संस्था, सावरगाव, ता. नागभीड

Web Title: After a year, I have not received any amount from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.