भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:29+5:30
तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : केंद्र्र शासनाने मंजूर केलेला भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा धार्मिक विभाजन करणारा असल्याचे आरोप करून भारतीय मुस्लिम परीषद, बहुजन समाज व अन्य संघटनांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. महेबूब भाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदाराला निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहिद बाबूराव शेडमाके चौकात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवून हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. मोर्चात महेबुब अली शेख, अजगरअली शेख, भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष जमालूद्दीन शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकाबंळे, शब्बीर जागिरदार, प्रा. लक्ष्मण मंगाम, डॉ. अंकुश गोतावळे, रशिद शेख, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशपाक शेख, किसन लव्हराळे, नगरसेवक रशीद अली, सत्तार शेख ,गफ्फार शेख, लाला शेख, आरीफ शेख, कलीम शेख, मुन्ना शेख, रसुल शेख, सलीम सय्यद, सलीम शेख,जबार शेख ,जबार कुरेशी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जमालूदीन शेख, अजगरअली शेख, शब्बीर जागीरदार, सत्तार शेख व शहरातील विविध संघटनांनी सहकार्य केले.
भद्रावतीत संविधान बचाव रॅली
भद्रावती : सुधारीत नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी विविध संघटनांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी १ वाजता संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वामी मंदिराच्या प्रांगणातून ही रॅली काढण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी संघटना, बीआरएसपी, बीएसपी, आरपीआय, भाकपा, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती, आदिवासी संघटना, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, विमुक्त जनजाती विकास आदी संघटना रॅलीचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कुशल मेश्राम, राजू देवगडे, मुनाज शेख, हाजी जाकीर, भगतसिंग मालुसरे, भास्कर ताजणे, सुधाकर रोहणकर, रत्नाकर साठे, राजू गैनवार, हाजी जावेद शेख, बशीर भाई आदींनी केले.