अगरबत्ती प्रकल्पामुळे महिलांना रोजगार

By admin | Published: April 13, 2017 12:49 AM2017-04-13T00:49:20+5:302017-04-13T00:49:20+5:30

बफरझोन क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी,...

Agarbatti project employs women | अगरबत्ती प्रकल्पामुळे महिलांना रोजगार

अगरबत्ती प्रकल्पामुळे महिलांना रोजगार

Next

पळसगावात प्रकल्प : वनविभागाकडून रोजगार निर्मिती
वासेरा: बफरझोन क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी, या उद्देशाने पळसगाव (पिपर्डा) वनपरिक्षेत्रासाठी पळसगाव येथे अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यातून अनेक बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला आहे.
शामाप्रसाद जनवन विकास योजना पळसगावतंर्गत १ जानेवारीपासून ताडोबा अगरबत्ती प्रकल्प जनधन विकास योजना पळसगाव या नावाने अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. सदर प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित झालेला आहे.
सदर प्रकल्पावर २० लाखाची गुंतवणुक करण्यात आली. त्यात शेडचे बांधकाम, कच्चा माल पुरवठा, माल तयार करणे, मशिन खर्च आदीवर खर्च करण्यात येत आहे. अगरबत्ती प्रकल्पातून पळसगाव येथील २२ महिलांना नियमीत रोजगार मिळत आहे. त्यातून प्रत्येक महिलांना रोज आठ ते दहा तास काम केल्यानंतर १५० ते २०० रुपये मजुरी मिळत आहे. यातून महिलाचा आर्थिक स्तर उंचावत आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. यावेळी प्रतिनिधीने वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. मुरकुटे यांच्याशी संपर्क केला असता, सदर प्रकल्पातून महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे महिलांना समाधान लाभले आहे. तसेच भविष्यात पुन्हा जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. यासाठी इको डेव्हलपमेंट समितीचे अध्यक्ष प्रभाकर गजबिये, वनपाला लोखंडे सहकार्य करीत असल्याचे सागितले. तसेच सदर प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वी. एस. मुरकुटे, वनपाल मु. व्ही. लोखंडे, जनवन विकास अधिकारी प्रभाकर गजभिये यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आला असल्याची माहिती दिली.

Web Title: Agarbatti project employs women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.