राज्यातील स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा वाढवून द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:57+5:302021-05-20T04:29:57+5:30

मागील दोन वर्षांपासून कोविड -१९ या महामारीने संपूर्ण देशाला ग्रासले असून त्याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरू शकले ...

The age limit for competitive examinations in the state should be increased | राज्यातील स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा वाढवून द्यावी

राज्यातील स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा वाढवून द्यावी

Next

मागील दोन वर्षांपासून कोविड -१९ या महामारीने संपूर्ण देशाला ग्रासले असून त्याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरू शकले नाही. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांचा मार्ग मोकळा करायला संधी उपलब्ध नसल्याने लाखो तरुण स्पर्धेची तयारी करत असून वय वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होईल, या आशेने हे युवक जिद्दीने अभ्यास करीत आहेत; परंतु कोविड -१९ या महामारीने त्यांच्या मार्गात अडथळा आल्याने मागील दोन वर्षांपासून कोणतीच सरळ सेवा भरती होऊ शकली नाही. अशावेळी जे युवक स्पर्धेची वर्षानुवर्षे तयारी करीत आहेत, त्यांचे मागील दोन वर्षांपासून कोणतीच भरती होऊ न शकल्यामुळे वय वाढत आहे. शासनाने त्वरित दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून सर्व युवकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रशांत रागीट यांनी केली आहे.

Web Title: The age limit for competitive examinations in the state should be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.