बिरसा मुंडा स्मारक उभारण्यासाठी आंदोलन तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:50+5:302021-06-11T04:19:50+5:30
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिरसा स्मारकाच्या आंदोलनस्थळी जननायक बिरसा मुंडा यांना बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. स्मारक ...
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिरसा स्मारकाच्या आंदोलनस्थळी जननायक बिरसा मुंडा यांना बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. स्मारक उभारण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा संकल्प आदिवासी संघटनांनी केला आहे. हातात मेणबत्त्या घेऊन मानवी साखळी तयार करून स्मारक उभारणीसाठी सुरू असलेल्या प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईचा मूक निषेध करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नरेन गेडाम, तर प्रमुख पाहुणे डॉ. मधुकर कोटनाके उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक तुमराम यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. आदिवासींच्या संयमाची परीक्षा प्रशासनाने पाहू नये. येत्या १५ जून २०२१ पासून याच ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. यात आमच्या आरोग्यास किंवा जीवितास धोका उत्पन्न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. यापुढे स्मारक उभारण्यासाठी चालणारे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अशोक तुमराम यांनी दिला. शासनाने जननायक बिरसांचे स्मारक ताबडतोब उभारावे, अशी मागणी आदिवासी समाजाने केली. यावेळी संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके, रमेश आडे, गोकुल मेश्राम, हिरामन मडावी, युवराज मेश्राम, जमुना तुमराम, प्रिती मडावी, मधुकर मडावी, वैशाली मेश्राम, विजय मेश्राम, संगीता येरमे व आदिवासी बांधव उपस्थित होते.