शेतकऱ्यांच्या ठेवी परत न केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:50+5:302021-07-02T04:19:50+5:30
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांचे पैसे देण्याचे टाळत आहेत. शेतकऱ्यांना योग्य ...
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांचे पैसे देण्याचे टाळत आहेत. शेतकऱ्यांना योग्य वागणूक देऊन त्यांचे पैसे त्वरित परत करा, रक्कम परत न केल्यास बँक बंद आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिला आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सिंदूर येथील शेतकरी, तसेच जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी जमा, तसेच मुदत ठेवमध्ये रक्कम टाकली आहे. विचारपूस तसेच रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचारी शेतकऱ्यांना योग्य उत्तर न देता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना याबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर थेट शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँक गाठली. यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचे पैसे त्वरित परत करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, एक महिन्याच्या आतमध्ये पैसा परत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बॅँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शेतकऱ्यांचे पैसे एक महिन्याच्या आतमध्ये परत करण्याचे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना दिले आहे.