वनविकास महामंडळाचा अनागोेंदी कारभार

By admin | Published: January 14, 2017 12:43 AM2017-01-14T00:43:31+5:302017-01-14T00:43:31+5:30

मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात मागील सहा महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून...

An agonic corporation of the development corporation | वनविकास महामंडळाचा अनागोेंदी कारभार

वनविकास महामंडळाचा अनागोेंदी कारभार

Next

अधिकाऱ्याचा मुख्यालयाला खो : स्थानिक मजूर कामापासून वंचित
कोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रात मागील सहा महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून विडींगसह अनेक कामात ठेकेदारांशी हात मिळवणी करुन गैरप्रकार होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.
झरण वनपरिक्षेत्र आधीच अनेक गैरप्रकारात बदनाम असून या क्षेत्रात कार्यरत तत्कालीन वनाधिकारी अजय पवार यांनी सहा महिन्याच्या सेवेत अपप्रकार करुन अनेक मजुरांना मजुरी दिली नाही. त्याची दखल लोकमतने घेत वरिष्ठांना कारवाई करण्यास भाग पाडले. त्याच त्यांची तडकाफडकी बदली देचली येथे करण्यात आली. त्या ठिकाणी सुनिल गोरे यांनी पदभार स्वीकारला. मागील कामाचा आढावा घेत सुरळीत कामे करुन कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन नियमानुसार जंगली कामे करुन झरण क्षेत्राची विस्कटलेली घडी बसविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अजय पवार यांच्या पावलावर पाऊल टाकीत विविध कामात गैरप्रकार करणे सुरु केले. त्यांनी विडींगच्या कामात मोठ्या प्रमाणात अनागोदी कारभार करीत विडींगच्या कामासह अनेक कामे मर्जीतील ठेकेदाराद्वारे अंदाजपत्रकानुसार व नियमानुसार केलेले नाही.
या कामात स्थानिक मजुरांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)

ठेकेदारांना नियमबाह्य देतात कामे
झरण वनक्षेत्रात भरपूर प्रमाणात हंगामी कामे असतात. त्यासाठी क्षेत्रालगत गावातील मजुरांना कामे देणे आवश्यक असताना स्थानिक मजुरांना अंदाजपत्रकाप्रमाणे कामे प्रत्यक्ष मजुरांकडून करणे आवश्यक असतात. मात्र तसे न करता ठेकेदारांकडे कामे सोपवून त्यांच्याद्वारे कामे करवून स्वत:चे आर्थिक हित जोपासले जात आहेत. स्थानिक मजुरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाबाबत मागणी करुन कामे उपलब्ध देण्याची मागणी केली. यात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनाही निवेदन देण्यात आले होते व स्थानिकांना रोजगार अल्पशाप्रमाणात मिळत आहे. बांबू, बांबू बंडल, चपाटी बांबू यासह इमारती लाकडे, बिट, फाटे निष्कासनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याची वाहतूक करण्याची दहा किमीच्या आतील कामे स्थानिकांना देण्याचा नियम असताना तसे करण्यात आले नाही. सरसकट सर्व कामे निविदा मागवून देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक वाहतूकदार कामापासून वंचित झाले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडी
महामंडळाचे विविध कामे जंगलात असतात. क्षेत्रीय कामे संबंधित वन कर्मचाऱ्यांकडून मजुरामार्फत करायची असतात. त्यासाठी वनाधिकारी मुख्यालयाला मुक्कामी राहणे आवश्यक असताना व त्यांच्या निवासाची व्यवस्था असतानाही वनाधिकारी बल्लारशाहून रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे त्याचे कर्मचारीही मुख्यालयी राहात नाही. त्याचा गंभीर परिणाम महामंडळाच्या कामावर व जंगल व प्राणी संरक्षणावर होत आहे.

चौकशीची मागणी
सुनील गोरे यांच्या कार्यकाळात झालेल्या विंडीगच्या कामाची तसेच इतर कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनकर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची गंभीर बाब असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धिरज बांबोळे यांनी केली आहे.

Web Title: An agonic corporation of the development corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.