खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्या कृषी केंद्रांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:05+5:302021-09-19T04:29:05+5:30

यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी ...

Agricultural centers causing artificial scarcity of fertilizers will be inspected | खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्या कृषी केंद्रांची होणार तपासणी

खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्या कृषी केंद्रांची होणार तपासणी

Next

यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रासायनिक खताचे वितरण एम-एफएमएस प्रणालीवर ई- पॉस मशीनवर करणे बंधनकारक असताना काही परवानाधारक रासायनिक खत विक्रेते ऑफलाईन विक्री केल्यामुळे पोर्टलवर युरिया शिल्लक दिसतो. खताच्या उपलब्धतेमध्ये अडचण होऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. वाढीव दराने खताची विक्री तसेच अनावश्यक खत उत्पादनांची जबरदस्तीने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या संबंधित परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करावी. पुढील दोन दिवसात कृषी केंद्राची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा व दोषी आढळणाऱ्या परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्र धारकांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले. जिल्ह्यात ४ लाख ४६,१०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत ४,५५,५२१ म्हणजेच ९४.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली. विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले.

बॉक्स

७ हजार ९२५ मेट्रिक टन युरिया शिल्लक

जिल्ह्यात नियमितपणे युरिया व इतर खतांची उपलब्धता होत राहील, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, खरीप हंगाम २०२१ करिता ५०,६९० मेट्रिक टन युरिया कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवटंन मंजूर आहे. १ एप्रिल ते १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात ४८,१२० मेट्रिक टन म्हणजेच ९४.९२ टक्के युरियाची उपलब्धता आहे. जिल्ह्यात ७ हजार ९२५ मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे.

बॉक्स

रब्बीसाठी २२,२४० मेट्रिक टन युरिया आवंटन

खरीप हंगाम २०२१ (३० सप्टें.२०२१) अखेर युरिया खताची ६०८३ मेट्रिक टन उपलब्धता नियोजित आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. जिल्हाकरिता २२,२४० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने मंजूर केले. त्यानुसार युरिया खताची जिल्ह्यात नियमित उपलब्धता असणार आहे.

Web Title: Agricultural centers causing artificial scarcity of fertilizers will be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.