चिखलगाव येथे कृषी संजीवनी मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:06+5:302021-06-27T04:19:06+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील चिखलगाव येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत गुरुवारी कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान कृषी ...
सावरगाव : नागभीड तालुक्यातील चिखलगाव येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत गुरुवारी कार्यक्रम घेण्यात आला.
दरम्यान कृषी विभागाच्या मार्गदर्शकांनी बियाणांच्या वाणाबाबत विस्तृत माहिती दिली. यामध्ये बियाणे तीन टक्के मिठाच्या पाण्यामधून काढून बीजप्रक्रिया महत्व पटवून दिले. गादी वाफ्यावर पऱ्हे पेरणी करणे तसेच १० टक्के रासायनिक खताची बचत मोहीम अंतर्गत माहिती व त्याचे फायदे प्रात्यक्षिक करून दाखविले. पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे व त्याचे फायदे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे, पट्टा पद्धतीने धान रोवणी करणे, भात रोप वाटिकेचे नियोजन कसे करावे व त्याचे फायदे कसे मिळवावे, या विषयाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. याप्रसंगी चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी, खोब्रागडे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. शिंदे, कृषी पर्यवेक्षक एस.ए. पाकमोडे, कृषी सहायक जे. आर. माटे यांची उपस्थिती होती.