सांडपाण्यामुळे अडीच हेक्टर शेतजमिनी नापिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:55 PM2019-01-22T22:55:52+5:302019-01-22T22:56:15+5:30

ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

Agricultural water harvesting nipikas due to sewage | सांडपाण्यामुळे अडीच हेक्टर शेतजमिनी नापिकी

सांडपाण्यामुळे अडीच हेक्टर शेतजमिनी नापिकी

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांची एसडीओकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
घुग्घुस येथील विठोबा संभू बोबडे, शामराव रामचंद्र बोबडे, महादेव सीताराम बोबडे, देवराव कर्णू बोबडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. या शेतकºयांची सुमारे २ हेक्टर जमीन वेकोलि तलाव व गावाला लागून आहे. कृषियोग्य उपजाऊ शेतजमिनीत ग्रामपंचायतीने मागील अनेक वर्षांपासून गावातील नालीद्वारे सांडपाणी सोडल्या जात आहे. त्यामूळे सदर जमिनीतून उत्त्पन घेता येत नाही. कृषी योग्य उपजाऊ जमिनीत गावातील पाणी सोडू नये, याकरिता तक्रारी देऊनही ग्रामपंचायतने लक्ष दिले नाही. परिणामी, मागील पाच वर्र्षांपासुन आर्थिक नुकसान होत आहे.
नालीचे सांडपाणी सोडण्याला ग्रामपंचायतीने प्रतिबंध घालावे. साचलेले पाणी बाहेर काढून ही जमीन कृषी उत्पादनासाठी उपयुक्त करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराकडे करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी ही समस्या सोडविणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत.

Web Title: Agricultural water harvesting nipikas due to sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.