कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये

By admin | Published: October 26, 2016 01:19 AM2016-10-26T01:19:21+5:302016-10-26T01:19:21+5:30

शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावल्यामुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचेप्रमाण वाढत आहे.

Agriculture should not be autoswitch | कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये

कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये

Next

महावितरणचे आवाहन : रोहित्र जळण्याच्या घटना टाळण्याचा प्रयत्न
चंद्रपूर: शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावल्यामुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचेप्रमाण वाढत आहे. परंतु अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅटोस्विचचा वापर करु नये, असे आवाहन महावितरणे केले आहे.
राज्यात सुमारे ३९ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना महावितरणकडून दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप सुरू करण्याचा त्रास वाचविण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप सुरू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये. तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास काढून टाकण्याची विनंती करावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी राहील असे वीज कंपनीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

आॅटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर लावा
कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला कपॅसिटर बसवावा. त्यामुळे वीज बचत होऊन पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो. कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांनी कमी होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाणही कमी होते. या सर्वाचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

Web Title: Agriculture should not be autoswitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.