कृषी उत्पन्न दुप्पट करूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:53 PM2018-12-26T22:53:09+5:302018-12-26T22:53:38+5:30

समूहशेती, गटशेती, सिंचन क्षमतावृद्धी, दुभत्या जनावरांची उपलब्धता, आधुनिक शेतीप्रशिक्षण, जोडधंदा व रोजगाराच्या विविध संधी निर्माण करून बल्लारपूर-मूल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची आहे. यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुशी येथील आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

Agriculture will double the yield | कृषी उत्पन्न दुप्पट करूच

कृषी उत्पन्न दुप्पट करूच

Next
ठळक मुद्देसुधीर मुनंगटीवार : सुशी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समूहशेती, गटशेती, सिंचन क्षमतावृद्धी, दुभत्या जनावरांची उपलब्धता, आधुनिक शेतीप्रशिक्षण, जोडधंदा व रोजगाराच्या विविध संधी निर्माण करून बल्लारपूर-मूल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची आहे. यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुशी येथील आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समिती सभापती पूजा डोहणे, मूल नगर परिषदचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवताडे, राहुल संतोषवार, सरपंच कमला गोरंतवार, सुनील आयलनवार, विवेक बुरांडे, सीताराम भांडेकर, अजय शेंडे, कल्पना सोयाम, शोभा मांदाडे, प्रियंका कुनघाडकर, भारती राऊत, उपअभियंता वसुले आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांनी २०२२ पूर्वी शेतकºयांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्याचे निश्चि केले आहे. त्यांच्या अभिवचनाची पूर्तता या मतदारसंघात सर्वात आधी केल्या जाईल. शेतकºयांना आवश्यक सोयीसुविधा व सर्व योजनांची अंमलबजावणी करणार आहे. मुल परिसरामध्ये चार वर्षांमध्ये १२५ कोटी खर्च करून १०४ किलोमीटरचे रस्ते निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. चिचडोह येथे ५०० कोटींचा खर्च प्रकल्प पूर्ण होत असून परिसरातील ५ हजार शेतकºयांना समूह शेतीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. मोठ्या प्रमाणात विकल्या जाणारे वाण ९१ गावांमध्ये पिकवण्यासाठी शेतकºयांना प्रशिक्षण दिले जात आहे.
माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणाल्या, वाघाच्या हल्ल्यापासून संरक्षण देणे व सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. मुनगंटीवार यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहेत. रस्ते, शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचन या बाबतीतही हा मतदारसंघ पुढे आहे. अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी मागील चार वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. बल्लारपूर- मूल क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
बंद पडलेले प्रकल्पही सुरू होणार
पोंभूर्ण्यांत जोडधंदा म्हणून टूथपिकचा प्रकल्प उभा केला जात आहे. या परिसरात सर्व लहानमोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील, यासाठी प्रयत्न सुरू असून बंद पडलेले प्रकल्पही सुरू केल्या जातील. शेतकरी हिताच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणी या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे होईल, याबाबत आपण जागरूक असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले. बल्लारपूर मतदारसंघ धुरापासून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. सर्व ग्रामपंचायतींना १० लक्ष किंमतीचा शुद्ध पाणीपुरवठा करणारी आरो मशीन उपलब्धता करून देण्यात येईल. सर्व अंगणवाड्या आयएसओ दर्जाच्या होतील, असेही त्यांनी नमुद केले.

Web Title: Agriculture will double the yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.