भद्रावतीतील कोविड केअर सेंटरला अहीर यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:31+5:302021-05-15T04:26:31+5:30
भद्रावती : कोविड १९च्या आपत्कालीन स्थितीत भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार यांच्या कार्याची दखल घेत, स्थानिक श्री मंगल ...
भद्रावती : कोविड १९च्या आपत्कालीन स्थितीत भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार यांच्या कार्याची दखल घेत, स्थानिक श्री मंगल कार्यालय येथील कोविड सेंटर व शिंदे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली. कोविड सेंटर तथा हॉस्पिटलची पाहणी केली.
यावेळी डॉ.विवेक शिंदे व रवींद्र शिंदे यांच्यासोबत हंसराज अहीर यांनी चर्चा केली. भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवारातर्फे ग्रामीण भागातील जनतेकरिता तालुक्यातील ग्रामपंचायतींना मास्क, सॅनिटायजरचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जाणून घेतली.
शिंदे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधे नि:शुल्क ओपीडी, हेल्पलाइन नंबर, श्री मंगल कार्यालयातील चारशे खाटांचे नि:शुल्क कोविड केअर युनिट, जिल्ह्यातील रुग्णांकरिता बेड, ऑक्सिजन व प्लाझ्मा डोनरची व्यवस्था करुन देणे, हे सर्व जाणून या कार्याचे कौतुक अहीर यांनी केले. शिंदे परिवाराचे जिल्ह्यातील हे पहिले नि:शुल्क कोविड सेंटर असून, भविष्यात या कार्याचा आदर्श समाजापुढे राहील, असे अहीर म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, संजय वासेकर, गोपाल बिंजवे व भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.