चंद्रपुरात वायुगळती; नवपरिणीत वधूसह कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 10:07 AM2021-07-13T10:07:03+5:302021-07-13T11:01:52+5:30

Chandrapur News दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरू राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Air leak in Chandrapur; Six members of the same family died | चंद्रपुरात वायुगळती; नवपरिणीत वधूसह कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू

चंद्रपुरात वायुगळती; नवपरिणीत वधूसह कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर- दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरू राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सहाजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे.

या भागात काही दिवसांपासून वीजपुरवठा नियमित नव्हता. लष्कर कुटुंबात दहा दिवसांपूर्वीच लग्नकार्य झाले असल्याने घरात जनरेटर आणले होते. सोमवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर सुरू होता. या जनरेटरमधूनच विषारी वायु गळती झाल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

 28 जूनला अजय लष्कर याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी नववधू माधुरीला तिच्या माहेरून, नागपूरहून सोमवारी दुपारी ४ वाजता त्याने घरी आणले होते. सकाळी घराचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी जिवंत होती. मात्र काही वेळातच तिचाही दुर्देवाने मृत्यू झाला.
मृतांमध्ये मारोती लष्कर, दातू रमेश लष्कर , माधुरी अजय लष्कर, पूजा रमेश लष्कर, लखन रमेश लष्कर, कृष्णा रमेश लष्कर यांचा समावेश आहे. 

Read in English

Web Title: Air leak in Chandrapur; Six members of the same family died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात