गडचांदुरातील वायू प्रदूषणाने आयुर्मान घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:50+5:30
मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण लोकांच्या घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत असून, त्याबाबत फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहे. प्रचंड प्रमाणात हे धुळीचे कण वातावरणात पसरत असल्यामुळे शरीरात सुद्धा धुळीचे कण जाऊन अनेक नागरिक विविध रोगांनी ग्रासले आहे. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये वायू प्रदूषणाचा इतका त्रास नसून गडचांदूरसारख्या ५० हजार लोकवस्तीच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण ही सिमेंट कंपनी करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील सिमेंट कंपन्यांमुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. गडचांदूर येथील नागरिकांचे यामुळे सरासरी आयुर्मान घटत आहे. तत्काळ सिमेंट कंपनीचे वायू प्रदूषण न थांबविल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या दिला आहे.
मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण लोकांच्या घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत असून, त्याबाबत फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहे. प्रचंड प्रमाणात हे धुळीचे कण वातावरणात पसरत असल्यामुळे शरीरात सुद्धा धुळीचे कण जाऊन अनेक नागरिक विविध रोगांनी ग्रासले आहे. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये वायू प्रदूषणाचा इतका त्रास नसून गडचांदूरसारख्या ५० हजार लोकवस्तीच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण ही सिमेंट कंपनी करीत आहे.
अनेक आंदोलने, मोर्चे व निवेदने देऊन सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा निवेदनात केलेला आहे. वायू प्रदूषणाबाबत खोटा अहवाल तयार करून शासनास पाठविण्याचे काम प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही कोणाला न्याय मागायचा, हा प्रश्न आहे.
या आधी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मेलद्वारे सिमेंट कंपनीच्या चिमणीतून सुटणारा धूर व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत फोटो निवेदनासह पाठविले आहे. मात्र, त्यावर अजूनपर्यंत काहीही कारवाई झालेली नसून याकडे लक्ष वेधले आहे.