दोन टप्प्यांमध्ये विकसित होणार विमानतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:40 PM2018-04-27T23:40:48+5:302018-04-27T23:42:22+5:30

राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील जमिनीवर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडून २० मार्च २०१८ ला तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून दोन टप्प्यांमध्ये विमानतळाचा विकास केला जाणार आहे.

Airport will be developed in two phases | दोन टप्प्यांमध्ये विकसित होणार विमानतळ

दोन टप्प्यांमध्ये विकसित होणार विमानतळ

Next
ठळक मुद्दे४७ कोटींचा निधी मंजूर : राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील जमिनीवर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान विकास कंपनीकडून २० मार्च २०१८ ला तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून दोन टप्प्यांमध्ये विमानतळाचा विकास
केला जाणार आहे.
विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भारतीय विमान प्राधिकरणातर्फे ३ जानेवारी २०१८ ला सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणानुसार निश्चित केलेली जागा विमानतळासाठी प्राथमिकदृष्ट्या योग्य असल्याचे प्राधिकरणाने मान्य केले. याशिवाय प्रस्तावित विमानतळाचा विकास दोन टप्प्यांमध्ये करण्यासाठी प्राधिकरणातर्फे राज्यसरकारला सुचनाही देण्यात आल्या आहेत.
ग्रीनफिल्ड विमानतळाची उभारणी व विकास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसाठी विशेष हेतू संस्था म्हणून प्राधिकृत केले. प्रस्तावित जमिनीमधील ३३२.६० एकर शासकीय जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने गुरुवारी मान्यता प्रदान केल्याने येत्या काही महिन्यांतच पायाभूत कामांना सुरुवात होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्राने वर्तविली. भूमिसंपादन पूनर्वसन व पूर्नस्थापना करताना भरपाई देणे व पारदर्शक अधिनियम २०१३ अंतर्गत थेट खरेदी करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रीनफिल्ड विमानतळासाठी संपादीत करावयाच्या खासगी जमिनीपैकी ४६३.७३ एकर जमीन संपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापन आणि जिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाकडे कळविले होते. त्यानुसार ४१ कोटी आणि इतर खर्चासाठी ५ कोटी असे एकून ४६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वित्तीय मान्यता दिली आहे.
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यानुसार ग्रीनफिल्ड विमानतळाची उभारणी क्यू-४०० व त्यापेक्षा कमी विमानांकरिता प्रस्तावित करण्यात आली. या क्षमतेचे विमान धावपट्टीवर अत्यंत सुरक्षितरित्या उतरावे, त्यासाठी २ हजार ५० मीटर लांब व ४५ मीटर रूंद अशी धावपट्टी बांधण्यात येणार असून ७२० एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
दुसरा टप्पा
या टप्प्यामध्ये ए-३२० व त्यापेक्षा कमी प्रकारच्या विमानांकरिता सुमारे ३ हजार मीटर लांब व ४२ मीटर रुंद धावपट्टीची गरज आहे. महाराष्ट्र विमान विकास कंपनीच्या निर्देशानुसार अत्याधुनिक विमानांच्या सुरक्षेसाठी ही धावपट्टी सक्षम ठरणार असून त्यासाठी १२१ एकर अतिरिक्त जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे.
खासगी जमिनीसमोरील अडचणी
विमान कंपनी प्राधिकरणाच्या निकषांनुसार चंद्रपूर विमानतळासाठी एकूण ८४० एकर जमिनीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये ५०७.४० एकर खासगी आणि सरकारी व वनजमिनी मिळून एकून ३३२.६० एकर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. सरकारी व वनजमिन ताब्यात घेण्यासाठी सरकारला अडचण येणार नाही. मात्र, ५०७.४० एकर खासगी जमीन अधिग्रहित करताना पूर्नवसन व पूर्नस्थापनाच्या प्रश्नांना सरकारला सामोरे जावे लागणार आहे. सरकार यातून कसा मार्ग काढेल, यावरच प्रास्तावित ग्रीनफिल्ड विमानतळाचे भविष्य अवलंबून आहे.

Web Title: Airport will be developed in two phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.