नाकाबंदीतही जिल्ह्यात दारुचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:48+5:30

एका ट्रकद्वारे वणीकडून नांदाफाटा येथे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सांगोळा फाटा रोडजवळ नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ४७४६ या वाहनातून २३ लाख १६ हजार रुपये किंमतीच्या २३९ पेट्या दारु व ट्रक असा ३३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

Alcohol flood in the district despite blockade | नाकाबंदीतही जिल्ह्यात दारुचा महापूर

नाकाबंदीतही जिल्ह्यात दारुचा महापूर

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेचे धाडसत्र : ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर व कोरपना येथे कारवाई करुन ३७ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना अटक रण्यात आली आहे.
एका ट्रकद्वारे वणीकडून नांदाफाटा येथे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सांगोळा फाटा रोडजवळ नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ४७४६ या वाहनातून २३ लाख १६ हजार रुपये किंमतीच्या २३९ पेट्या दारु व ट्रक असा ३३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर रामनगर परिसरात नाकाबंदी करुन एका चारचाकी ह्युंडाई सॅन्ट्रो वाहन व दारु असा चार लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात पोउपनि सचिन गदादे, भोयर, पोना बल्की, अमजद, सतीश, मिलिंद, नितीन, संजू आतकुलवार, अमोल धंदरे, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार यांनी केली.

किरमिरी घाटावरून नावेने दारु वाहतूक
आक्सापूर : वर्धा नदीचा पात्रातून नावेने दारु वाहतूक सुरु असल्याची माहिती धाबा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली. या कारवाईत नावेसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बाळू ताजणे, प्रदिप उयके, सुनील उइके, नागेश ठाकूर, बंडू पाल असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. ही कारवाई ही कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुशिल धोकटे यांनी केली.

शंकरपुरात ९६ हजारांची दारु जप्त
शंकरपूर : येथील एका दारू विक्रेत्याच्या घरी पोलिसांनी धाड टाकून ९६ हजार रुपयांची देशी दारू सोमवारी जप्त केली. पवन जनार्धन राहुड (४४) दारुची अवैध विक्री करीत असल्याची माहिती भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर धाड टाकून ९६ हजार रुपये किंमतीची २० पेट्या देशी दारू जप्त केली. आरोपीला चिमूर न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावन्यात आली. ही कारवाही ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जगम, पोलीस शिपाई करपे आदींनी केली.

Web Title: Alcohol flood in the district despite blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.