चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व ३८ दरवाजे उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:28+5:302021-05-26T04:29:28+5:30

नागरिकांनी वैनगंगा नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. नदीवर आंघोळ व मासेमारी करू नये, नदी ...

All 38 gates of Chichdoh Barrage project will be opened | चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व ३८ दरवाजे उघडणार

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व ३८ दरवाजे उघडणार

Next

नागरिकांनी वैनगंगा नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. नदीवर आंघोळ व मासेमारी करू नये, नदी घाटातून रेती काढणे, पशुपालक, नदीतून ये-जा करणे टाळावे, बॅरेज परिसरातील व नदीकाठच्या नागरिकांनी स्वत:ची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाने केले. चिचडोह बॅरेज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर कृषी सिंचनाचाही प्रश्न सुटला आहे.

असा आहे बॅरेज प्रकल्प

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. हा बॅरेज मार्खंडा (देव) देवस्थानापासून वैनगंगा नदीवरच्या बाजूला ४ किलोमीटरवर आहे. बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर आहे. १५ मीटर लांब ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेत. या प्रकल्पाचे सर्व दरवाजे १२ ऑक्टोबर २०२० रोजी दरवाजे बंद करण्यात आले होते

Web Title: All 38 gates of Chichdoh Barrage project will be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.