नंदोरी टोलनाका प्रकरणातील सर्व आरोपी दोषमुक्त
By admin | Published: February 24, 2016 12:47 AM2016-02-24T00:47:58+5:302016-02-24T00:47:58+5:30
भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याच्या विरोधात १६ वर्षांपूर्वी आंदोलन करून तोडफोड केल्या ...
१९९९ चे होते प्रकरण : वरोरा न्यायालयाचा निर्णय
घुग्घुस : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याच्या विरोधात १६ वर्षांपूर्वी आंदोलन करून तोडफोड केल्या प्रकरणी न्यायालयीन सुनावनीदरम्यान मंगळवारी सर्व १२३ व्यक्तींना दोषमुक्त करण्यात आले.
या १२३ जणांमध्ये तत्कालीन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनायक बांगडे, युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र वैद्य, एनएसयुआयचे तत्कालिन पदाधिकारी प्रविण पडवेकर, विनोद दतात्रय, प्रशांत शिंदे यांच्यासह १२३ जणांचा समावेश होता. यातील अनेकजण सध्या वेगवेळ्या पक्षात आणि पदांवर कार्यरत आहेत. तेव्हा हे सर्वजण काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्या सर्वाविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरोरा येथील सह दिवाणी न्यायाधीश कराभदन यांनी सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदोरी गावाजवळ उभारण्यात आलेल्या टोलनाक्याविरोधात १९९९ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. यात संतप्त जमावाने दगडफेक करून नाक्याची तोडफोड केली होती.
फेब्रुवारी-१०१३ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयासमोर आले. तेव्हापासून प्रकरणातील आरोपींची सातत्याने बयान नोदविणे सुरू होते. या कालावधीत १२७ आरोपींपैकी १५ आरोपींचा मृत्यू झाला. तब्बल १७ वषारंनंतर या प्रकराणचा निकाल लागला. यात राजेंद्र्र वैद्य, विनायक बांगडे, प्रविण पडवेकर, नंदू नागरकर, प्रशांत शिंदे, चंद्रशेखर गुंडावार, विनोद दत्तात्रेय, देवेंद्र आर्य, नितीन शर्मा, अफजभाई, रवींद्र्र शिंदे, जगतारसिंग गिल, तेजंदरसिंग सबरवार, दयाशंकर तिवारी, निरिक्षण तांड्रा, हारिष दुर्योधन यांच्यासह सर्व जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींच्या वतीने अॅड. फुलझेले आणि अॅड. बोढाले यांनी बाजू मांडली होती. (वार्ताहर)