सर्व शाखीय माळी समाज भद्रावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:21+5:302021-01-08T05:32:21+5:30
भद्रावती : सर्व शाखीय माळी समाज भद्रावतीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माया निकोडे, तर प्रमुख ...
भद्रावती : सर्व शाखीय माळी समाज भद्रावतीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माया निकोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उषा सातपुते, रेखा चहारे, स्नेहा खडके, मंदा जुनघरे, आदी उपस्थित होते. यावेळी महिलांची क्रांतिज्योती ब्रिगेड महिला आघाडीची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रृतिका जुनघरे, उपाध्यक्ष सुनंदा खंडाळकर, रजनी कांबळे, सचिव कांचन लंगडे, रोशनी कांबळे, सुजाता बगडे, कविता जुनघरे, वैशाली कांबळे, सोनू चौधरी, सीमा कांबळे, ज्योती सोनुले, शिल्पा देशाई, मनीषा सोनुले, मनीषा गावतुरे, मनीषा खडसे, सविता बगडे, स्वाती वासेकर, रूपा चहारे, आदी उपस्थित होते.
जयभीम वाचनालय सावली
फोटो
सावली : येथील जयभीम वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे, उपाध्यक्ष सुनीता बोरकर, माजी अध्यक्ष अरविंद गेडाम, सदस्य हेमलता गेडाम, गीरजाबाई मानकर, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. वाचनालयाच्या अध्यक्ष लता लाकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून त्यांचे विचार-आचार अंगीकारण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल डिलक्स डोहणे यांनी आभार मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.