सर्वच बांधकाम कामगारांनी करावी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:35 PM2018-11-27T22:35:48+5:302018-11-27T22:36:55+5:30

आपल्या मनातली घरे बांधणारे, निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणाºयांना कामगारांना शासन विविध सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी केले. जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते.

All construction workers should register | सर्वच बांधकाम कामगारांनी करावी नोंदणी

सर्वच बांधकाम कामगारांनी करावी नोंदणी

Next
ठळक मुद्देओमप्रकाश यादव : कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या मनातली घरे बांधणारे, निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणाºयांना कामगारांना शासन विविध सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी केले. जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. शैलेश मुंजे, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सदस्य अशोक भुताळ उपस्थित होते. यादव म्हणाले, शासन कामगारांना घरे, सुरक्षा व योजनांची अंमलबजावणी करत आहे. २८ प्रकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी सज्ज आहे. तथापि, त्यासाठी कामगारांची नोंद होणे गरजेचे आहे. शासनाने इमारत वबांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध योजना तयार केलेल्या आहेत. मात्र नोंदणी नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: All construction workers should register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.