सृष्टीतील सर्व जीवांना जगण्याचा समान हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:32 AM2017-10-07T00:32:32+5:302017-10-07T00:32:43+5:30
मानवाप्रमाणेच सृष्टीतील प्रत्येक सुक्ष्म व महाकाय जीवांना जगण्याचा समान हक्क आहे. मानवाने मुख्य जनावरांची शिकार करण्याऐवजी प्राणीमात्रांवर प्रेम करुन पर्यावरणाचा समतोल राखणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : मानवाप्रमाणेच सृष्टीतील प्रत्येक सुक्ष्म व महाकाय जीवांना जगण्याचा समान हक्क आहे. मानवाने मुख्य जनावरांची शिकार करण्याऐवजी प्राणीमात्रांवर प्रेम करुन पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले.
गोंडपिपरी येथे वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत वनसप्ताह निमित्ताने आयोजित जनजागृती रॅलीला संबोधीत करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष संजय झाडे, उद्घाटक म्हणून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार किशोर येरणे, उपनगराध्यक्ष चेतनसिंह गौर, उपस्थित होते.
रानावनात मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचा मानव वस्तीत शिरकाव यावर नगराध्यक्ष संजय झाडे यांनी उ्स्थितांना माहिती पटवून दिली. यावेळी स्थानिक नगरपंचायत कार्यालय जवळून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमात वन्यजीव संरक्षणात वनविभागाला विशेष सहकार्य करणाºया नांदगावचे पोलीस पाटील विभा खामणकर, प्रमोद गौरकार, प्रकाश खामनकर, विठ्ठलवाडाचे सरपंच मधुकर लखमापुरे यांचा सत्कार करण्यात आला.
सदर रॅलीमध्ये आदिवासी साखरदेव वाद्य ग्रुप माडेआमगाव यांच्या विशेष पथकाने पारंपारीक आदिवासी नृत्य करीत रॅलीची शोभा वाढविली. सदर रॅली गोंडपिपरी- आलापल्ली मार्गाने निघून उपक्षेत्र वनविभाग कार्यालय येथे सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले, प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. राऊतकर तर आभार क्षेत्र सहाय्यक नरेश भोपरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक वेलमे, हेपट, ढुमणे, नैताम, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पेंढारकर, पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे व सहकारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.