जिवतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : बाळू धानोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:31+5:302021-03-06T04:27:31+5:30

ते जिवती येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा ...

All round development of life is the goal: Balu Dhanorkar | जिवतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : बाळू धानोरकर

जिवतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय : बाळू धानोरकर

googlenewsNext

ते जिवती येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, माधव जीवतोडे, सुग्रीव गोतावडे, तालुका अध्यक्ष गणपत आडे, पंचायत समिती सभापती अंजना पवार, उपाध्यक्ष नगर पंचायत अशपाक शेख, सीताराम मडावी, रोहित सिगडे, मारोती कुंभरे, आशिष ढसाळे, विलास पवार, किसन राठोड, ताजुद्दीन शेख, माधव डोहींफोडे यांची उपस्थिती होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सर्व जनतेने मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून बचाव करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांच्या लाभ, घरकुलाचा प्रश्न , लोकाभिमुख सेवा व विकासकामांना गती द्यावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.

महावितरण अधिकाऱ्यांना कृषी व घरगुती वीज जोडणी न कापण्याची तंबी तसेच वीज बिलांचे नवीन धोरण प्रभावीपणे राबविण्यकरिता जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: All round development of life is the goal: Balu Dhanorkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.