बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप
By admin | Published: July 2, 2017 12:41 AM2017-07-02T00:41:21+5:302017-07-02T00:41:21+5:30
परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत गावात सिंमेट बंधाऱ्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत गावात सिंमेट बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामूळे हे काम निकृष्ठ पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भारी ग्रामपंचायतंर्गत येत असलेल्या चोपनगुडा (कामतगुडा) येथे लघुसिंचाई पाटबंधारे विभागाअंतर्गत सिंमेट बंधाऱ्याचे काम सुरू आहे. सदर योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी शासकीय जबाबदार व्यक्ती म्हणून अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीच कामावर दुर्लक्ष करीत कंत्राटदाराची पाठराखण करीत असल्याने कंत्राटदार निकृष्ठ दजार्चे साहित्याचा वापर करीत आहे. सदर बांधकामात मोठ्या प्रमाणात दगड वापरल्याचे बोलले जात आहे. संबंधित कामाची विभागीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत संबंधित अभियंतास विचारले असता, तुम्ही निकृष्ठ साहित्य किंवा दगड दाखवण्यासाठी बंधारा फोडण्याचा सल्ला दिला.