आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन आर्थिक मदतीचे वाटप
By admin | Published: May 30, 2016 01:13 AM2016-05-30T01:13:08+5:302016-05-30T01:13:08+5:30
तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयास मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाच ेवितरण आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन केले.
परवड थांबली : तीन शेतकरी कुटुंबांना लाभ
वरोरा: तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयास मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाच ेवितरण आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन केले.
या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयाची परवड वाचली. सदर उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच शासनाकडून मिळणाऱ्या निधीबाबत विचारणा करण्याकरिता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार बाळू धानोरकर यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना घरी जाऊन धनादेश वितरण करण्याची योजना तयार केली. त्यानुसार त्यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी या उपक्रमाबाबत चर्चा केली.
तहसीलदार भांडारकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाच्या घरी जाऊन धनादेश वितरणाची योजना तयार केली. आमदार बाळू धानोरकर व तहसील कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील पुष्पा पिंपळशेंडे, महालगाव येथील सिंधू बदकी व चिनोरा येथील शोभा ठेंगळे यांच्या घरी एकाच दिवशी जाऊन शासकीय धनादेशाचे वितरण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, मार्डा येथील सरपंच योगीता पिंपळशेंडे, राजू चिकटे, महागावच्या सरपंच सुनंदा माकोडे, उपसरपंच ठेंगने, चिनोऱ्याच्या सरपंच सुशिला तेलमोरे, बाजार समितीचे संचालक संजय घागी, योगेश धामनकर, देवानंद मोडे पं.स. सदस्य अविनाश ठेंगळे, बोरगाव मोकासाचे सरपंच केशव डाहुले, भोजराज झाडे, वरोरा तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायतीचे सचिव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)