मृतकाच्या पत्नीला शिलाई मशीनचे वाटप; शिवसेना विनामूल्य प्रशिक्षणही देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:47+5:302021-06-20T04:19:47+5:30
कोरोना संसर्ग झालेल्या कुटुंबप्रमुख व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा गरजू कुटुंबातील विधवा ...
कोरोना संसर्ग झालेल्या कुटुंबप्रमुख व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा गरजू कुटुंबातील विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी गरजू शेतकऱ्यांना बियाणांचेही वाटप करण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार विनामास्क व्यक्तींना मूल परिसरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी सतर्क होऊन काळजी घेण्याचे आवाहन करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजदांची माहिती देण्यात आली. धानाचे पुंजणे जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होणे, अशा घटना घडल्यास मूल येथील शिवसेना कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले आहे. यावेळी उपतालुका प्रमुख रवी शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार, सुशी दाबगावचे सरपंच अनिल सोनुले, माजी तालुकाप्रमुख सुनील काळे, राहुल महाजनवार, संदीप निकुरे, निखिल भोयर, अरविंद करपे, शिन्नू कन्नुरवार, विनोद काळबांधे उपस्थित होते.