नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भावाने कापूस विक्रीकरिता मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:51+5:302021-01-04T04:23:51+5:30
कापूस उत्पादक पणन महासंघाने वरोरा परिसरातील पारस कॉटन, स्वामी कॉटन, बालाजी कॉटन इंडस्ट्रीज येथील केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी केंद्र ...
कापूस उत्पादक पणन महासंघाने वरोरा परिसरातील पारस कॉटन, स्वामी कॉटन, बालाजी कॉटन इंडस्ट्रीज येथील केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी केंद्र करणे अनिवार्य होते. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून हमी भावाने कापूस विकला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून अद्याप हमीभावाने कापूस विकला नाही, त्यांनी कापूस विक्रीकरिता आणावे तसेच ज्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी केली नाही, त्या शेतकऱ्यांनी सातबारा पीक पेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आदींच्या साक्षांकीत दोन प्रती आणाव्यात, एकाच दिवशी जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये, याकरिता कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोराच्या वतीने करण्यात आले आहे. हमीभावाने कापूस विक्रीसाठी कुठल्याही तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस आणता येईल.