हिंदीसोबत अन्य भाषांचाही विकास गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:16+5:302021-09-21T04:31:16+5:30
चंद्रपूर : प्राचिन भारतीय भाषा व स्थानिक बोलीभाषा नष्ट होण्यापासून वाचविणे अत्यावश्यक आहे. हिंदी भाषेच्या विकासातून देशाच्या उन्नतीचा मार्ग ...
चंद्रपूर : प्राचिन भारतीय भाषा व स्थानिक बोलीभाषा नष्ट होण्यापासून वाचविणे अत्यावश्यक आहे. हिंदी भाषेच्या विकासातून देशाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते मनोहर व्यास यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर बचाव संघर्ष संमितीच्या वतीने भारती हॉस्पिटल, चंद्रपूर येथे आयोजित हिंदी भाषा दिवस कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जुगलकिशोर सोमाणी होते. यावेळी माउंट कारमेलच्या हिंदी शिक्षिका तृप्ती चित्रावार, प्राध्यापिका क्रांती दहीवळे, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, संजीवनी कुबेर यांची उपस्थिती होती.
जुगलकिशोर सोमाणी म्हणाले, हिंदी भाषेचा विस्तार इंटरनेटच्या माध्यमातून जगासोबत जुडलेला आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेच्या उपयोगामुळेच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडू शकतो. माउंट कारमेलच्या हिंदी शिक्षिका तृप्ती चित्रावार यांनी शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीनेच हिंदी भाषेची सेवा शक्य असल्याच्या त्या म्हणाल्या. प्राध्यापिका क्रांती दहीवळे म्हणाल्या, जगातील अनेक देशांत हिंदी भाषेचा प्रयोग हा अखंड भारताची महिमा दर्शवित असते. अनेक देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी शिकविल्या जाते.
माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी म्हणाले, हिंदीच्या विकासासाठी भाषेला व्यावहारिकतेसोबत जोडणे आवश्यक आहे. हिंदीची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. नवे-नवे शोध हे हिंदी भाषेत व्हायला हवे, असेही ते म्हणाले. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन वनश्री मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. सपन दास, अश्विनी खोब्रागडे, दिनेश जुमडे व अन्य सदस्य उपस्थित होते.