पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

By admin | Published: April 12, 2015 12:51 AM2015-04-12T00:51:10+5:302015-04-12T00:51:10+5:30

उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. ..

Along with nutrition, teachers should also be educated | पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

पोषण आहारासोबतच शिक्षकांंनी विद्यार्जनही करावे

Next

पालकांची अपेक्षा : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजना
नागभीड : उन्हाळ्याच्या सुट्यांतही शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांत ही योजना कितपत यशस्वी होईल, अशी शंका यानिमित्ताने व्यक्त होत असली तरी योजनेबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून शालेय पोषण आहारासोबत याच वेळात विद्यार्जनही करावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
ज्या जिल्ह्याची परिस्थिती दुष्काळसदृश आहे, अश्या सर्व जिल्ह्यात शासनाने शालेय पोषण आहार उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या दृष्टीने अश्या दिवसांत ही योजना कटकटीची असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची आहे. तसेही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात. अश्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या योजनेविषयी योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितच ते शाळेत येतील आणि शाळेविषयी त्यांना ओढ कायम राहील.
कदाचित १०० टक्के प्रतिसाद या योजनेला या दिवसात मिळणार नाही, हे जरी खरे असले तरी जे विद्यार्थी या निमित्ताने शाळेत येतील, त्या विद्यार्थ्यांना किमान एक ते दीड तास शिक्षकांकडून पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. आणि अनेक शालोपयोगी उपक्रमही घेण्यात आले तर त्या शाळेचे निश्चितच नाव होणार आहे.
तसेही गेल्या काही वर्षात शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांसमोर मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे १५-२० वर्षाअगोदर शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टयांचा जो आनंद उपभोगता यायचा तो आनंद विद्यार्थी मिळविण्याच्या या नव्या उद्योगाने केव्हाचाच हिरावून घेतला आहे.
विद्यार्थी मिळविण्याच्या या उद्योगांवर चर्चा करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळ्याच्याही सुट्टयात शाळेत यावेच लागते. त्यामुळेच उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराने उन्हाळ्याच्या सुट्टयांचा आनंद हिरावला, असे म्हणणे उचित नाही. (तालुका प्रतिनिधी)
या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शारिरीक पोषण तर होईलच. पण त्याच बरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षकांचा सहवास लाभेल. शिक्षकांनी मनावर घेतले तर ते पुढच्या वर्षाची उत्तम तयारी करू शकतात. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल.
- गोकुल पानसे
मुख्याध्यापक,
सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड

Web Title: Along with nutrition, teachers should also be educated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.