आधीच सिलिंडर हजारच्या घरात, घरपोचसाठी वेगळी लूट कशाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:04+5:302021-09-12T04:32:04+5:30
बॉक्स वर्षभरात १०५ रुपयांची वाढ घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यावर्षी जून ...
बॉक्स
वर्षभरात १०५ रुपयांची वाढ
घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यावर्षी जून महिन्यात ८३५ रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी जुलैमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात गॅस सिलिंडरची वाढ करण्यात आली. आता सिलिंडरचे दर ९४० रुपये द्यावे लागत आहेत.
बॉक्स
डिलिव्हरी बॉयला वेगळे रुपये कशासाठी
पूर्वीच गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हजार रुपयांवर सिलिंडरचा दर पोहोचला आहे. त्यातच कधी कधी सिलिंडर पोहोचता करताना अतिरिक्त पैशांची मागणी करीत असतो.
- संजना रक्षमवार, गृहिणी
------
मागी काही वर्षात सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. ६०० रुपयाला मिळणारा सिलिंडर हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे परवडेनासे झाले आहे. त्यातच सिलिंडर पोहोचता करण्याचे अतिरिक्त पैसे देणे चुकीचे वाटते.
- अपूर्वा गेडाम, गृहिणी