महाकालीच्या भाविकांसाठी उभारले पर्यायी स्नानगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:16 PM2018-03-31T23:16:11+5:302018-03-31T23:16:11+5:30

सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या सोयीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झरपट नदीवर भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून येतात.

Alternative bathroom for Mahakali devotees | महाकालीच्या भाविकांसाठी उभारले पर्यायी स्नानगृह

महाकालीच्या भाविकांसाठी उभारले पर्यायी स्नानगृह

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : भाविकांना सोईसुविधा पुरवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या सोयीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झरपट नदीवर भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून येतात. त्यामुळे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी त्या ठिकाणी भाविकांसाठी पर्यायी स्नानगृहाची व्यवस्था करून दिली आहे.
महाकाली यात्रा परिसरात महापालिकेने विशेष अशी व्यवस्था केलेली दिसून येत नाही. या माता महाकाली मंदिरालगत पवित्र झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात. पण त्यांना तिथे स्नानगृहाची व्यवस्थासुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. शुक्रवारी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून आले. या ठिकाणी पर्यायी स्नानगृह असावे, अशी मागणी भाविकांनी जोरगेवार यांच्याकडे केली. जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्यांचा मानसिक कोंडमारा होतो. दरवर्षी हाच प्रकार सुरू असूनही मनपाने लक्ष दिले नाही. भाविकांची संख्या वाढतच आहे. मात्र, त्यांच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत.
मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दूषित पाण्यामध्ये स्नान करतात. ते पाणीसुद्धा मनपाकडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाचीसुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही. उघड्यावर शौचास बसावे लागत आहे, हे येथे येणाऱ्या भाविकांचे दुर्दैवच आहे. दर्शनाकरिता येणाºया महिला भाविकांची तर खूपच गैरसोय होत आहे. हागणदारीमुक्त शहर झाल्याचे महानगरपालिकेडून सांगितले जात आहे. मात्र यात्राकाळात ही बाब फोल असल्याचे दिसून येत आहे.
शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले आहे. पण या नदीच्या पात्रामध्ये कचºयाचे ढिगारे दिसत आहे. हा केरकचरा उचलण्याचे सौजन्यही महानगरपालिकेकडून दाखविले जात नाही. भाविकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्थासुद्धा करण्यात आली नाही. भाविकांना त्य पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा दिले जात नाही. ही सुविधा त्वरीत पुरवावी, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केला आहे.

Web Title: Alternative bathroom for Mahakali devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.