झोपताना ‘त्याच्या’ उशाला नेहमीच वाळवीचे डुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:47+5:30

  निलेश झाडे / राजेश माडूरवार     लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : आयुष्याचा शेवटचा टप्यावर तो उभा आहे. मात्र ...

Always dry his pillow while sleeping | झोपताना ‘त्याच्या’ उशाला नेहमीच वाळवीचे डुंबर

झोपताना ‘त्याच्या’ उशाला नेहमीच वाळवीचे डुंबर

googlenewsNext
ठळक मुद्देघरकुलाच्या प्रतीक्षेत आयुष्य चालले

  निलेश झाडे / राजेश माडूरवार
    लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : आयुष्याचा शेवटचा टप्यावर तो उभा आहे. मात्र घरकुलाची प्रतीक्षा संपलेली नाही. मातीच घर असल्याने घरात वारूळ निर्माण झाले. साप-विंचवाची कायमची  भीती. तरीही वारूळाला उशाशी घेऊन तो जगतो आहे. अंगावर शहारे आणणारी ही स्थिती आहे, वढोली येथील बंडू राऊत या वृध्दाची. 
लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट प्रशासनाला राऊत यांचे दुःख अद्यापही दिसले नाही. योजनांना पात्र होण्यासाठी लाभार्थ्याची स्थिती गरजेची नाही, तर कागदपत्र पुर्ण असणं गरजेचे झाले आहे. त्यामुळे असे वृध्द जगले काय किवा मेले काय, याच्याशी व्यवस्थेला आणि शासनाला काहीही देणंघेणं उरलेलं नाही, हेच सिध्द होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वढोली येथील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यास प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करीत आहे. छटाकभर कागदाच्या त्रुटीसाठी दिडशे प्रस्ताव अडकवून पडले आहेत. असेच एक लाभार्थी आहेत बंडू राऊत. त्यांची परिस्थिती अंगावर शहारे आणणारी आहे. घरासाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करून काहीएक फायदा त्यांना झालेला नाही. त्यांची झोपडी आता जीर्ण झालेली आहे. केव्हा कोसळेल याचा नेम नाही. मातीचं घर असल्यानं घरातच वारूळ निर्माण झालं. त्यामुळं साप-विंचवांची सतत भीती. पण तरीही जीवन आहे तोपर्यंत इथंच राहायचं आणि याच जागेवर घरकुल बांधून कुटुंबाला आधार द्यायचा, ही त्यांची अंतिम इच्छा. घरात साप-विंचवांची भीती असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या गावात पाठवलं. आणि स्वतः काबाडकष्ट करून ते अक्षरशः मृत्यूसोबत जगत आहेत. 
ऊन-वारा-पाऊसधारा याचा सामना करण्यास असमर्थ असलेल्या घराच्या बदल्यात नवं घरकुल मिळावं, यासाठी ते ग्रामपंचायतच्या पायऱ्या झिजवत आहेत. असे अनेक गावकरी आज घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार योजना आणते, पण त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, याचा हा उत्तम नमुना. अधिका-यांच्या उदासीनतेमुळं आज या वृद्धाला कुटुंबाचा आधार मिळू शकत नाही.  
घरकुलाच्या या गंभीर समस्येला घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कृती समिती स्थापन केली. तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करीत तहसीलवर मोर्चा काढला. मात्र असंवेदनशील लोकप्रतीनिधी आणि निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही .बंडू राऊत प्रमाणेच वढोली गावातील दिडसे कुटूंब घरकुलाची प्रतीक्षेत आहेत. 

या आहेत त्रुटी
 वढोली येथे घरकूल लाभार्थांची जाहीर झालेली यादी ‘ड’  यादी आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात घरकूल मंजूर होत असलेली यादी  ‘ब’  आहे. अजूनही ‘ब ’ यादीतील ४० हजार घरे पूर्ण व्हायची आहेत. जोपर्यंत ही घरे पूर्ण होणार नाही, तो पर्यत  ‘ड’  यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही. 

 

Web Title: Always dry his pillow while sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.