अंमलनाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:10+5:302021-06-18T04:20:10+5:30
अंमलनाला सौंदर्यीकरणासाठी सात कोटींचा निधी कोरपना : गडचांदूरनजीक असलेल्या निसर्गरम्य पहाडी भागातील अंमलनाला सिंचन प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून विकसित ...
अंमलनाला सौंदर्यीकरणासाठी सात कोटींचा निधी
कोरपना : गडचांदूरनजीक असलेल्या निसर्गरम्य पहाडी भागातील अंमलनाला सिंचन प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात यावे, अशी बऱ्याच वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. आ. सुभाष धोटे यांनी अंमलनाला पर्यटनाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सात कोटींचा निधी मंजूर केला असून ४ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.
एकूण रकमेपैकी २ कोटी ३६ लाख १३ हजार ३६९ रुपयांची निविदा निघाली असून विकास कार्याला प्रारंभ झाला आहे. अंमलनाला पर्यटनाच्या विकासासाठी चांदा ते बांदा प्रकल्पांतर्गत सात कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, कोरोनामुळे सदर निधी रद्द करण्यात आला होता. आ. सुभाष धोटे यांनी रद्द करण्यात आलेला निधी मंजूर करण्यासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा करून ४ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करून घेतले. उर्वरित २ कोटी २५ लाख रुपयांच्या मंजुरीसाठी आ. सुभाष धोटे प्रयत्नशील आहेत.
बॉक्स
तीन टप्प्यांत होणार विकास
अंमलनाला पर्यटन स्थळाचा विकास तीन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, कुंपण, रेस्टॉरंट, बगिचा, स्विमिंग पूल व झोपड्या तयार करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात नौकायन, (बोटिंग) मचाण, वॉटरपार्क तयार करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात वेस्टवेअरचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
बॉक्स
अतिक्रमण काढण्याचे आव्हान
अंमलनाला सिंचन प्रकल्पाच्या परिसरात काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण काढताना प्रशासनाला त्रास होणार आहे. मात्र, पर्यटनस्थळांच्या विकासाला मंजुरी मिळाल्यामुळे अतिक्रमण काढून पर्यटनस्थळ उत्तमरीत्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
कोट
सतत १५ वर्षांपासून अंमलनाला प्रकल्प येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अंमलनाला प्रकल्पाचा पाहिजे त्याप्रमाणे विकास होऊ शकला नाही. विकासासाठी निधीसुद्धा प्राप्त होत नव्हता. मात्र, आमदार सुभाष धोटे यांनी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- इबादूल सिद्दीकी, पर्यटनप्रेमी.
===Photopath===
170621\screenshot_20210617-125853_whatsapp.jpg
===Caption===
या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे