अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:49 PM2018-09-02T21:49:51+5:302018-09-02T21:50:29+5:30

अंमलनाला प्रकल्पाच्या काही भागातील पाणी हिरवे झाल्याने संबंधित विभागाने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून यामागचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

Amalnala dam water has become green | अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे

अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे

googlenewsNext

आशिष देरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : अंमलनाला प्रकल्पाच्या काही भागातील पाणी हिरवे झाल्याने संबंधित विभागाने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून यामागचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील चार दिवसांपासून अंमलनाला धरणातील काही भागातील पाणी हिरवेकंच दिसत आहे. विषारी रासायनिक पदार्थ मिसळल्यानेच हा प्रकार घडल्याचा शंका व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत हा नाला धरण १०० टक्के भरलेले आहे. वेस्टवेअरवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणाचे पाणी हिरवे पडणे पर्यटकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. ही कोणतीही नैसर्गिक बाब नक्कीच नाही. यामध्ये काहीतरी रसायनयुक्त पदार्थ मिसळल्यामुळे पाणी हिरवे झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. संबंधित विभागाने पाण्याचे नमुने तपासून कारणांचा उलगडा करावा.

नीरीकडून तपासणी करा-मुनगंटीवार
अमलनाला धरणाचे पाणी हिरवे झाल्याप्रकरणी त्वरित नीरीच्या सहकार्याने तपासणी करून योग्य उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले आहे. अमलनाला धरणाचे लाखों गॅलन पाणी अचानक हिरवे झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या धरणाचे पाणी प्रामुख्याने या परिसरातील शेतीसाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे परिसरातील जनावरेसुध्दा हे पाणी पितात. पाणी अचानक हिरवे झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेत निरीच्या सहकार्याने या प्रकरणाची तपासणी करून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.
तहसीलदारांकडून दखल
सदर गंभीर बाबीची दखल घेऊन तहसीलदार हरीश गाडे यांनी अमलनाला येथे जाऊन पाहणी केली. हिरव्या पाण्याचे नमूना तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
पाण्याची दुर्गंधी
पाणी हिरवे झाले असले तरी सदर पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाणी हिरवे होण्याचे नेमके कारण काय? याविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

Web Title: Amalnala dam water has become green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.