समाज निर्मितीसाठी झटणे ही आंबेडकरी जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:48 PM2018-11-20T21:48:33+5:302018-11-20T21:49:46+5:30

जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडिता अवस्थेत जुळले आहेत. सर्व मानवाला समान न्याय व समान स्वातंत्र्य असलेच पाहिजे. हे विचार मानणारी व अंगिकारणारी व नवसमाज निर्मितीसाठी झटणारी जाणीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे भदंत महाथेरो ज्ञानज्योती म्हणाले.

Ambedkar realized his struggle for the creation of society | समाज निर्मितीसाठी झटणे ही आंबेडकरी जाणीव

समाज निर्मितीसाठी झटणे ही आंबेडकरी जाणीव

Next
ठळक मुद्देभदंत ज्ञानज्योती : सामाजिक क्रांती अभियान धम्म पदयात्रेचे खडसंगीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : जगातील सर्व मानव आतून बाहेरून परस्परांशी अखंडिता अवस्थेत जुळले आहेत. सर्व मानवाला समान न्याय व समान स्वातंत्र्य असलेच पाहिजे. हे विचार मानणारी व अंगिकारणारी व नवसमाज निर्मितीसाठी झटणारी जाणीव हीच आंबेडकरी जाणीव आहे, असे भदंत महाथेरो ज्ञानज्योती म्हणाले.
कोरेगाव भीमा शौर्यदिन द्विशताब्दी महोत्सवानिमित्त भिक्खू संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सामाजिक क्रांती अभियानाची धम्म पदयात्रा सोमवारी खडसंगीत दाखल झाली. यावेळी स्थानिक सम्राट अशोका बुध्दविहार येथे बौद्धबाधंवाना धम्मसंदेश देताना ते बोलत होते. बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी संपूर्ण भिक्खू संघ व धम्म यात्रेतील धम्मबांधव उपस्थित होते.
दीक्षाभूमी चंद्रपूरपासून निघालेली ही पदयात्रा ४८ दिवसांत सरासरी १०६७ किमीचे अंतर कापत १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे पदयात्रेचे समापन होणार आहे. भिक्खू संघासह शेकडो समाज बांधवांचा समावेश असलेली ही पदयात्रा सोमवारी खडसंगीत दाखल झाली होती. स्थानिक धम्मबांधवांच्या वतीने या पदयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावापासून एक किमी अंतरपासून भिक्खूच्या चरणी फुलांचा वर्षाव करीत शेकडो समाजबांधव या पदयात्रेत सहभागी झाले होते. नवयुवक मित्र मंडळांच्या वतीने धम्मयात्रेचे स्वागत करण्यात आले. सोमवारी खडसंगी येथे या यात्रेचा विश्राम होता. मंगळवारी पहाटे ध्यानसाधना व बुध्द वंदनेचे पठण केल्यानंतर धम्मयात्रा पुढील दिशेने रवाना झाली.
धम्म पदयात्रेतील धम्मबांधवांच्या भोजदनाची व विश्रामाची व्यवस्था भीमज्योति संस्था व पंचशील संस्था यांनी केली होती. यावेळी सुधाकर गणवीर, खेमराज पाटील, धर्मेंद्र रामटेके, राजकुमार चुणारकर, विवेक खोब्रागडे, सचिन सोनटक्के, अमन फुलझेले, लखन जांभूळे, बादल गेडाम, अलोक रामटेके, पीयुष गेडाम, दीक्षांत खोब्रागडे, हर्ष रामटेके, चंदन रामटेके आदी उपस्थित होते.

Web Title: Ambedkar realized his struggle for the creation of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.