अंबुजाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:50 PM2018-03-13T23:50:52+5:302018-03-13T23:50:52+5:30

उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमीहीन झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलन केले.

Ambuja's inquiry started | अंबुजाची चौकशी सुरू

अंबुजाची चौकशी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देएक सदस्यीय समिती स्थापन : प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून घेतली

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमीहीन झालेल्या आदिवासी व इतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आंदोलन केले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) कल्पना ठुबे यांची एक सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली. दरम्यान या समितीने प्रहारचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक पप्पू देशमुख व प्रकल्पग्रस्तांना मंगळवारी बोलावून चर्चा केली.
आदिवासी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रहार संघटनेतर्फे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण, मोर्चा, अंबुजाला गाव बंदी, ६० किमी पदयात्रा अशी विविध आंदोलन करण्यात आली. ज्याबाबत अंबुजाने न्यायालयाच्या स्तरावर आंदोलनाच्या विरोधात मागितलेल्या मनाई हुकूमाला न्यायालयाने नकार दिला. प्रहारने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी सोनापूर ते चंद्रपूर व्हाया गडचांदूर ‘शेतकऱ्यांची वारी कलेक्टरच्या दारी’ अशी ६० किमी पदयात्रा काढल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा घेवून ठिय्या मांडला. दरम्यान जिल्ह्याधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, समितीने प्रहारचे जिल्हाध्यक्ष देशमुख व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी सालेगुडा येथील लिंगू लचू कुमरे पाटील, सोनापूरचे सरपंच सुगंधा जुमनाके, उपसरपंच देवराव कोटनाके, जयवंत जुनघरे, प्रवीण मटाले, आकाश लोडे, सचिन पिंपळशेंडे, निखिल भोजेकर, घनश्याम येरगुडे, फिरोज खान पठान, दिनेश झाडे, सत्यपाल किन्नाके हे उपस्थित होते. यावेळी अंबुजाच्या भूमिअधिग्रहण व प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाच्याविरोधात सप्रमाण आपले आक्षेप नोंदविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार ४५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकरणाचा काय निष्कर्ष निघतो, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ambuja's inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.