आयसीआयसीआयकडून मनपाला रुग्णवाहिका व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:13+5:302021-05-12T04:29:13+5:30
चंद्रपूर : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडले आहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर ...
चंद्रपूर : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडले आहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगर पालिकेला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी आयसीआयसीआय बँकेने ही भेट मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की, नगरसेवक संदीप आवारी, संजय कंचर्लावार, उपायुक्त विशाल वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, आयसीआयसीआय बँकेचे वैभव माकोडे, विवेक चौधरी, श्रीकांत ठाकूर उपस्थित होते. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना संसर्गासोबत ऑक्सिजची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली. याशिवाय गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका भेट दिली. कोरोना रुग्णांना मदत व्हावी, यासाठी आणखी सहकार्य करू, अशी ग्वाही आयसीआयसीआय बँकेचे प्रादेशिक प्रमुख विवेक बल्की यांनी दिली.