चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णवाहिका उलटली; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 09:07 PM2021-06-11T21:07:14+5:302021-06-11T21:08:16+5:30
Chandrapur news गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
नीरज चापले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयाची ही रुग्णवाहिका चंद्रपूरहून परत जात असताना वाटेत दोन गाई आडव्या आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती उलटली. या दोन्ही गाईंवर आदळून ती उलटून पडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही रुग्णवाहिका रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला.
कोठारी पोलिस ठाण्याचे ठाणेदार तुषार चौहान हे चौकशी करत आहेत.