पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका मंजूर.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:52+5:302021-05-08T04:28:52+5:30
राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे आमदार सुभाष धोटे यांनी ...

पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका मंजूर.
राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे आमदार सुभाष धोटे यांनी रुगणवाहिका भेट दिली आहे. यासाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत १५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच साथीचे आजारसुध्दा फोफावत आहेत. एकूण परिस्थिती लक्षात घेता जिवती तालुक्यातील पाटणसारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांना रूग्णांना आवश्यकतेनुसार ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. स्थानिक नागरिकांची ही गरज आणि कोरोना रुग्णांसाठी यथासंभव मदत करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे युद्धस्तरावरील प्रयत्न सुरू आहे. आमदार सुभाष धोटे यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत येथे तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामुळे अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागातील रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होईल. आमदार सुभाष धोटे यांनी या आधीच जिवती येथे १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे, हे विशेष. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सदर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळताच येथे रुग्णवाहिका उपलब्ध होईल.