शहरामध्ये दररोज ३० रुग्णांना घेऊन अम्बुलन्सची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:25+5:302021-04-28T04:30:25+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात तालुका पातळीवर उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय नाही. ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात तालुका पातळीवर उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय नाही. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील गंभीर रुग्ण व ज्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे, अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यासोबतच शहरातील इतर कोरोना रुग्णसुद्धा उपचारासाठी कोविड रुग्णालयात येतात. शहरात जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची दोन कोविड रुग्णालये व २९ खासगी कोविड रुग्णालये आहेत. परंतु, सद्यस्थितीत बहुतांश रुग्णालयातील बेड भरलेले आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्या रुग्णांना बेडसाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा घालाव्या लागतात. शहरात बहुतांश रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा मारत असल्याची स्थिती आहे.
बॉक्स
दिवसातून अनेक फेऱ्या
रुग्णाच्या नातेवाइकांना मिळालेल्या माहितीनुसार त्या रुग्णालयात नेण्यात येते. परंतु, तिथे पोहोचेपर्यंत बेड गेलेला असतो. मग दुसऱ्या हॉस्पिटलचा शोध घ्यावा लागतो. अशा अनेक फेऱ्या ॲम्बुलन्सवाल्याला माराव्या लागतात.