घुग्घुस येथे उद्यापासून आंबेडकरी साहित्य संमेलन

By admin | Published: January 14, 2015 11:04 PM2015-01-14T23:04:46+5:302015-01-14T23:04:46+5:30

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.़ राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

Amdadrik Sahitya Sammelan from Goghugas tomorrow | घुग्घुस येथे उद्यापासून आंबेडकरी साहित्य संमेलन

घुग्घुस येथे उद्यापासून आंबेडकरी साहित्य संमेलन

Next

घुग्घुस : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.़ राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ४ दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर विचारवंत आपले विचार व्यक्त करणार आहेत. याबरोबर विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़
१६ जानेवारी रोजी सांयंकाळी ६ वाजता डॉ़ बाबासाहेब यांचे अस्थिकलश, ग्रंथ व संविधान प्रबोधन रॅली, प्रज्ञाबुध्द विहार घुग्घुस कॉलरी येथून निघणार आहे़ १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेन गेडाम राहणार असुन संदेश वाचन देवानंद सुटे करणार आहेत़
यावेळी ज्येष्ठ साहित्यीक अशोक बुरबुरे, जिग्मे त्सुल्ट्रोम (तिबेट), ई़ झेड़ खोब्रागडे, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, मोहनदास नैमिशराय, प्रा़ अविनाश डोळस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ दूपारी २ वाजता सांसदीय लोकशाही आणि आंबेडकरवाद या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४ वाजता माझे लेखन, माझी चळवळ या विषयावर अनुभव कथन, सायंकाळी ७ वाजता अजय चेतन प्रस्तुत वादळवारा गीतांचा कार्यक्रम व रात्री ८ वाजता उशाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन होणार आहे़
१८ जानेवारीला सकाळी ८ वाजता मनोहरदीप रूसवा यांचा भीम गीतांचा कार्यक्रम असून सकाळी १० वाजता लोकशाही हा केवळ परस्परांचे अनुभव परस्परांंना देवुन घेऊन संघबध्द राहण्याची सहजीवनाची एक पध्दती आहे या विषयावर चर्चासत्र होणार आहे़ तसेच १९ जानेवारीलाही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे़
नागरिकांनी आंबेडकरी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन संमेलन समिती घुग्घुसच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Amdadrik Sahitya Sammelan from Goghugas tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.