१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:40 AM2017-11-26T00:40:09+5:302017-11-26T00:40:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी चारचाकी वाहनासह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वैभव वसंत गोमासे (३३), कन्हैया किसन साळंूखे (३३) दोघेही रा. वर्धा या दोघांना अटक केलीे. ही कारवाई शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने केली.
नागपूरवरुन चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेच चौकात नाकाबंदी करुन वाहनातून दारुसाठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, सदर दारु मध्यप्रदेशमधील मूलताई येथून शहरातील खंजर चौकात उतरविण्यात येणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. ही कारवाई पीएसआय वैरागडे यांच्याही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंबोरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुनील उईके, एसआय दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, महेंद्र बुजारे, कुंदनसिंग बाबरी, प्राजंल झिलपे, पंजाब मडावी आदींनी केली. शुक्रवारी संध्याकाळीसुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय वैरागडे यांच्या नेतृत्वातील चमूने चारचाकी पीकअप वाहनातून १९ पेट्या दारु जप्त केली होती. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली. दोन मोठ्या कारवाईने अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.