चिमुरात साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:42 PM2017-08-27T22:42:50+5:302017-08-27T22:44:00+5:30
चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया सिंदेवाही नेरी चिमूर मार्गाने चारचाकी वाहनाने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची.....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया सिंदेवाही नेरी चिमूर मार्गाने चारचाकी वाहनाने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांना मिळाली. त्या आधारावर शनिवारी सकाळी नेरी-सिंदेवाही मार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन २५ पेट्टया विदेशी दारुसह चार चाकी वाहन सहा सात लाख ७० हजारांचा मुद्देमाल चिमूर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
सिंदेवाही वरुन पांढºया रंगाच्या चार चाकी वाहनाने अवैधरित्या दारुची वाहतूक करीत असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच चिमूर पोलिसांनी नेरी- जांभुळघाट परिसरात सापळा रचला. पोलिसांना बघताच कारचालकांनी उलट दिशेने कार पळविली. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करुन कार क्रमांक एमएच-३४- एए- ५३२७ ही गाडी अडवून तिचामधील दारुसाठा जप्त केला. यावेळी त्यामधून २५ पेट्या दारु किंमत व चार चाकी वाहन असा एकूण सात लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला.
यावेळी रजंत भैसराज बोळे (३३) रा. पळसगाव (जाट) योगेश् अशोक नागरे (२४) रा. सिंदवाही यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात केली.