आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना मिळाला वाढीव वेतनातील फरकाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:19 AM2021-07-11T04:19:56+5:302021-07-11T04:19:56+5:30

कोरोना महामारीतही अभियानातील कर्मचारी न डगमगता कार्यरत आहेत. बरेच कर्मचारी व कुटुंबातील सभासद कोविड बाधित झाले. त्यांना पैशाची नितांत ...

The amount of difference in incremental pay received by the health mission staff | आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना मिळाला वाढीव वेतनातील फरकाची रक्कम

आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना मिळाला वाढीव वेतनातील फरकाची रक्कम

Next

कोरोना महामारीतही अभियानातील कर्मचारी न डगमगता कार्यरत आहेत. बरेच कर्मचारी व कुटुंबातील सभासद कोविड बाधित झाले. त्यांना पैशाची नितांत गरज आहे. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संघटनेने चर्चा केली. अखेर सर्व कर्मचाऱ्यांचा एरिअर्स त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनीही सहकार्य केले. एरिअर्स डाटा तयार करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शीतल राजपुरे, जिल्हा लेखा व्यवस्थापक प्रवीण सातभाई, सर्व लेखापाल नामदेव, प्रकाश मोहुर्ले, विकास वाढई, श्रीमंत पुणेकर यांचेही सहकार्य उपयोगी ठरल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे यांनी दिली.

Web Title: The amount of difference in incremental pay received by the health mission staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.