मानधनाची रक्कम दुष्काळग्रस्तांना
By admin | Published: May 3, 2016 01:16 AM2016-05-03T01:16:53+5:302016-05-03T01:16:53+5:30
दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पाण्यासाठी त्राही त्राही होत असताना सरकार ही चिंतेत पडले आहे. अशा वेळी
चंद्रपूर : दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पाण्यासाठी त्राही त्राही होत असताना सरकार ही चिंतेत पडले आहे. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना पुढे येत आहे. चंद्रपुरातील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांनी दुष्काळग्रस्तांबाबत मानवता दाखवत आपल्या एका महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना दिले आहे. सुमारे एक लक्ष रुपयांचा हा निधी मुख्यमंत्री सहायता कोषमध्ये (दुष्काळग्रस्तासाठी) देय केला आहे. सोमवारी स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर सर्वांना सुखावनारी व समाधानाची गार थंडावा देणारी गोष्ट येथील राजकीय वर्तृळातून समोर आली आहे.
येथील चंद्रपूर शहर महानगरपालिका सभागृह नेता रितेश (रामू) तिवारी व स्थायी समिती सभापती संतोष लहामगे व १२ नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला.
काँग्रेसचे नगरसेवक संतोष लहामगे, संगीता अमृतकर, रितेश (रामू) तिवारी, एस्तेर प्रसन्ना शिरवार, अनिता कथडे, सुनिता अग्रवाल, दुर्गेश कोडाम, करीमलाला काझी, राजेश अड्डूर, अनिल रामटेके, एकता गुरुले, सुभेदिया कश्यप, महेर सिडाम यांनी आपले एक महिन्याचे मिळणारे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदत निधीसाठी जिल्हाधिकारी दिपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केले.
रितेश (रामू) तिवारी व संतोष लहामगे यांच्यासारखेच इतरही लोकप्रतिनिधी, संस्था व सामाजिक संघटनांनी या कामी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्तांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)