साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: July 1, 2016 01:06 AM2016-07-01T01:06:01+5:302016-07-01T01:06:01+5:30

तळोधी (बा.) पोलीसविभागातर्फे गुरुवारी सकाळी अवैधरीत्या दारूची पुरवठा करणाऱ्या स्कॉपिओ गाडीची गुप्त माहिती मिळताच सिनेस्टाईल पाठलाग करुन

An amount of Rs | साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

नऊ आरोपींना अटक : भद्रावती, तळोधी(बा.), गडचांदूर येथे कारवाई
तळोधी (बा.): तळोधी (बा.) पोलीसविभागातर्फे गुरुवारी सकाळी अवैधरीत्या दारूची पुरवठा करणाऱ्या स्कॉपिओ गाडीची गुप्त माहिती मिळताच सिनेस्टाईल पाठलाग करुन स्कॉप्रिओ गाडी मुद्देमालासहीत ७ लाख ५३ हजार ८०० रुपयांची दारु पकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
तळोधी (बा.) पोलीस विभागातर्फे अवैधरीत्या चंद्रपूरला तळोधी मार्गे दारू नेत असल्याची गुप्त माहिती मिळताच तळोधी (बा.) पोलीस विभागातर्फे सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली. मात्र आरोपी सचिन श्रीराम भोयर (२८) रा. शिवाजीनगर, महाल नागपूर, व इम्रानखान युसूफ उर्फ बाबा खान (२४) यशोधरा नगर, नागपूर हे सुसाट वेगाने पळाले. परंतु तळोधीला नाकेबंदी असल्यामुळे तळोधी पेट्रोल पंपाजवळून परत गाडी नागभीडला सुसाट वेगाने पळविली मात्र तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे शिपाई जयंत चुनारकर यांचे बाईकने पाठलाग केला. मात्र समोर पोलीस विभागाची नाकेबंदी असल्यामुळे समोरुन ड्रायव्हरने गाडी परत तळोधी मागील वळविली. आरोपीने तुकूम (तिव्हर्ला) जवळच्या नाकेबंदी पोलीस विभागाच्या गाडीवर चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस विभागाच्या वाहन चालक सतीश वंजारी यांच्या समय सूचकतेमुळे पोलीस वाहनातील शांताराम चनेकर, रामचंद्र जनेकर, चांगदेव गिरडकर, हंसाराजा सिडाम, सतीश नेवारे, संजय मांढरे हे थोडक्यात बचावले.
ओवाळा बोकडोह नाल्याकाठी आरोपीने गाडी सोडून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोधी पोलीस स्टेशनचे शिपाई जयंत चुनारकर यांनी पाठलाग करुन आरोपीला अॉटोमध्ये बसताना पकडले. आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई तळोधी (बा.) ठाणेदार विवेक सोनवाने यांच्या मार्गदर्शनात झाली. (वार्ताहर)

गडचांदूर येथे दारू जप्त
गडचांदूर: बेला येथून गडचांदूरकडे अवैध विदेशी दारू आणताना तीन मोटरसायकल पकडल्या. तसेच सहा आरोपींकडून ३२१ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान कोरपना रोडवरील विद्युत मंडळ कार्यालयापासून मोटार सायकल क्र. एमएच- ३४ एसी ३४, एमएच-३४ एयू- ७६६६, एमएच- ३४ एजी- ७५५४ आरोपी शंकर रामचंद्र कोटरंगे (२९) कुंदन मुकुंदा रोहने (१९), प्रणव बाळू घायवनकर (१९), विकास सांभाजी कोटरंगे (२१), सुरज शंकर आदे (१९) , उज्वल बंडू दुर्योधन (२०) यांचे जवळू ३२१ विदेशी दारू बाटल्या किंमत ५३ हजार ४०० रुपये जप्त करून आरोपीना अटक केली. तीन मोटारसायकलची किंमत दीड लाख रुपये आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद रोकडे करीत आहेत. (वार्ताहर)

भद्रावती पोलिसांनी पाठलाग करुन पकडली ४० पेट्या दारू
भद्रावती: नागपूर- चंद्रपूर महामार्गावरुन चारचाकी वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. तब्बल अर्धा तास पाठलाग करुन आरोपीसह ४० पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी दुपारी १२ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजय रामदास मुंडे (३४) रा. हिंगणघाट असे असून हा एमएच-४० यू- २९२६ या चारचाकी वाहनाने देशी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती पोउनि सुशील धोकटे यांना मिळाली. आयुध निर्माणी गेटजवळ नाकाबंदी असल्याने वाहन चालबर्डी गावाच्या दिशेने वळविले. तब्बल अर्धा त्या वाहनाचा पाठलाग करुन शेतशिवारातून ताब्यात घेतले. गाडीतील ४० पेट्या दारु दोन लाख व चारचाकी वाहन १० लाख असा १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाही ठाणेदार विलास निकम , पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे नापो धनराज गेडाम यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: An amount of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.